नागपंचमी दिवशी २० वर्षांनंतर बनलाय शिवयोग, या पाच राशींना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 11:38 AM2020-07-25T11:38:58+5:302020-07-25T12:08:25+5:30

यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २००० मध्ये बनला होता.

आज नागपंचमी. यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २०० मध्ये बनला होता. पंचमीच्या तिथीला लक्ष्मी असेही म्हणतात. त्यामुळे या पाच राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

मेष - Marathi News | मेष | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

मेष - मेष राशीच्या व्यक्तींसाठी नागपंचमीदिवशी बनलेला हा शिवयोग शुभदायी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. तसेच अडलेली कामे मार्गी लागतील. कर्जाऊ दिलेली रक्कम परत येईल. शिवलिंग आणि नागदेवतेला मध अर्पण करणे फलदायी ठरेल.

वृषभ - Marathi News | वृषभ | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

वृषभ - आजच्या दिवशी बनलेला शिवयोग वृषभ राशीच्या व्यक्तीमधील वाणीदोष दूर करेल. तसेच वाणीमध्ये बळ आल्याने नातेसंबंध सुधारतील. मुखातून निघालेले शब्द सत्य होतील. गुंतवणुकीच्या बाबतीत लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी दुधात बतासे मिसळून शिवलिंग आणि नागदेवतेला अर्पण केल्यास लाभ होईल.

 मिथुन - Marathi News | मिथुन | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

मिथुन - सध्या मिथुन राशीसाठी राहुकाळ सुरू आहे. तसेच केतू आणि गुरूची दृष्टीसु्द्धा या राशीवर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी परदेशातून धनप्राप्तीचा योग बनला आहे. तसेच अडकून पडलेले धन परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या व्यक्तींसाठी बेलपत्राच्या माळेवर कूंकू लावून शिवलिंग आणि नागदेवतेस अर्पण करणे लाभदायक ठरेल.

कर्क - Marathi News | कर्क | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

कर्क - कर्क राशीच्या व्यक्तींच्या १२ व्या भावात सध्या राहू आहे. त्यामुळे नागपंचमी दिवशी बनलेला शिवयोग सध्या जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर करेल. तसेच गेल्या काही काळापासून वाढलेला अवास्तव खर्च कमी होईल. ऋण दोष आणि शत्रूपासून सावध राहा. श्रावणात शिवलिंग आणि नागदेवतेला आमरस अर्पण करणे फलदायी ठरेल.

सिंह - Marathi News | सिंह | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये धनलाभाचे चांगले योग आहेत. या योगामुळे दुकान, घर आणि अन्य मालमत्तेत गुंतवणुकीसाठी शुभयोग आलेला आहे. शिवलिंग आणि नागदेवतेला पांढरे फूल आणि मिठाई अर्पण करणे लाभदायी ठरेल.

कन्या - Marathi News | कन्या | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींसाठी वाहनाचे सुख मिळण्याची चिन्हे आहेत. घरातील वातावरण चांगले राहील. यादरम्यान, एखादा छोटासा प्रवास होईल. मात्र धनलाभाच्या बाबतीत स्थिती सामान्य राहील.

तूळ - Marathi News | तूळ | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

तूळ - तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहू आणि केतू खूप लाभदायी आहेत. केतू तुम्हाला धनप्राप्ती करवून देईल. एवढेच नाही तर नोकरी आणि व्यापारामध्ये येत असलेल्या अडचणीही दूर करेल. पाण्यात काळे तीळ घालून शिवलिंग आमि नागदेवतेला अभिषेक करणे लाभदायी ठरेल.

वृश्चिक - Marathi News | वृश्चिक | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

वृश्चिक - वृश्चिक राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे. आता या राशीच्या लोकांसाठी चांगली वेळ सुरू होणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये यशस्वी होण्याचा योग तयार होत आहे. धनप्राप्तीच्याबाबतीतही लाभ होईल. शिवलिंग आणि नागदेवतेला मध अर्पण करणे लाभदायी ठरेल.

धनू - Marathi News | धनू | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

धनू - धनूराशीमध्ये सध्या राशीस्वामी गुरू आणि केतूचा वास आहे. या राशीसाठी हा संयोग अधिक खास ठऱणार आहे. त्यामुळे धनप्राप्ती होईल. तसेच आर्थिक योजना दीर्घकाळासाठी लाभदायी ठरतील. देवतेस गुळ अर्पण केल्याने लाभ होईल.

मकर - Marathi News | मकर | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

मकर - मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा संयोग चांगला आहे. मात्र या राशीमध्ये सध्या साडेसाती सुरू आहे. अर्थप्राप्तीच्याबाबतील स्थिती सामान्यच राहणार आहे.

कुंभ - Marathi News | कुंभ | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

कुंभ - कुंभ राशीमध्येसुद्धा शनीची साडेसाती सुरू आहे. कष्टांचे निवारण होईल. प्रकृती चांगली राहील. तसेच रागही कमी होईल. नातेसंबंध सुधारतील. अर्थप्राप्तीच्याबाबतीत परिस्थिती सामान्य राहील. थंड पाण्यात सफरचंद किंवा अन्य फळाचा रस मिसळून अभिषेक करणे लाभदायक ठरेल.

मीन - Marathi News | मीन | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

मीन - मीन राशीसाठी धनलाभाचे योग आहेत. लग्न-विवाहाच्याबाबतीत शिवयोग खूप फलदायी ठरणार आहे. आमरसामध्ये बतासे मिसळून शिवलिंग आणि नागदेवस अर्पण केल्याने लाभ मिळेल.