गंगाखेड तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:06 IST2018-05-10T18:06:27+5:302018-05-10T18:06:27+5:30

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहराजवळील मन्नाथ तलावात घडली.

The youth, who had gone to Gangakhed swimming pool, died drowning in the water | गंगाखेड तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू 

गंगाखेड तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू 

गंगाखेड (परभणी ) : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहराजवळील मन्नाथ तलावात घडली.

कडक उन्हाळ्यामुळे शहरापासुन जवळच असलेल्या मन्नाथ तलावावर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला नदीम खान सलीम खान पठाण  (१९) हा तरुण पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्या सोबत गेलेल्या लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने तिथे असलेल्या सय्यद बबलु, शेख नदीम, परवेज खान, सुनिल मुंडे, अश्रफ खान, रौफ हावलदार यांनी तलावात उड्या मारून त्याचा शोध सुरू केला मात्र तो मिळुन येत नव्हता. 

दुस्सलगाव येथील राजेश भुंगासे, सुरज बिजले, गोपीचंद भुंगासे, अर्जुन कचरे, जनाबाई भुंगासे यांना तरुण बुडाल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी मन्नाथ तलावाकडे धाव घेवुन शोध मोहीम सुरू केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तरुणास पाण्याबाहेर काढले. त्यास गंगाखेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 

Web Title: The youth, who had gone to Gangakhed swimming pool, died drowning in the water