परभणीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:37 IST2018-07-27T12:36:47+5:302018-07-27T12:37:30+5:30

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी परभणी तालुक्यातील वाडीदमई येथील एका १७ वर्षीय तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला़ 

Youth suicide attempt to demand maratha reservation in Parbhani | परभणीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

परभणीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 परभणी- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी परभणी तालुक्यातील वाडीदमई येथील एका १७ वर्षीय तरूणाने आज सकाळी ८ वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ 

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांकडून रास्ता रोको, जिल्हा बंद, लाक्षणिक उपोषण केले जात आहे.आज सकाळी तालुक्यातील वाडीदमई येथील रामेश्वर मुरलीधर गायकवाड या १७ वर्षीय तरूणाने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राहत्या घरी विष प्राशन केले. त्यानंतर नातेवाईकांनी रामेश्वर याला जिल्हा सामान्य रूण्गणालयात उपचारासाठी दाखल केले़ त्याच्यावर उपचार सुरू आहेत़

Web Title: Youth suicide attempt to demand maratha reservation in Parbhani