शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी धरणाचे पाणी 'फुकट'?; परभणी, हिंगोली अन् नांदेडकडे ८४ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:31 IST

शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली, मग बड्या संस्थांना सवलत का?

जिंतूर (जि. परभणी) : पूर्णा पाटबंधारे विभाग अंतर्गत बिगर सिंचन योजनेची तब्बल ८४ कोटी ८७ लाख ७६ हजार रुपयाची थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. यात परभणी महानगरपालिका सर्वात मोठा थकबाकीदार असल्याचे पुढे आले असून थकबाकी न भरल्यास महानगरपालिका, नगरपालिकांसह इतर संस्थांना कारवाईचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या येलदरी धरणातून परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शहरांना पिण्यासाठी, शेतीसाठी उद्योगासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या विविध पाणी वापर संस्थांकडे कोट्यवधींची पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने आता जलसंपदा विभागाने थकबाकीदारांना वसुलीसाठी इशारा दिला आहे.

पूर्णा पाटबंधारे विभाग, वसमतनगर अंतर्गत येणाऱ्या येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातून मोठ्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. महानगरपालिका परभणी राहटी आणि येलदरी उपसा योजनेची मिळून ६१ कोटी, हिंगोली जि.प. (ग्रा.पा.पु.): सुमारे १ कोटी ५४ लाख रुपये, परभणी जि. प. (ग्रा.पा.पु.): ७८ लाख ६९ हजार, जिंतूर १ कोटी ९५ लाख, पूर्णा ९ कोटी ३६ लाख, हिंगोली १ कोटी ९७ लाख आणि वसमत १ कोटी ५ लाख सेनगाव ३१ लाखांची थकबाकी आहे.

पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे १२ लाख ९१ हजार, रोकडेश्वर सूतगिरणीकडे ३ लाख ६९ हजार, नांदेड जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे ४२ लाख ९० हजार, छत्रपती संभाजीनगर ८३ लाख, याशिवाय जिंतूर तालुक्यात २३ गाव पाणीपुरवठा योजना पिंपळगाव काजळीकडे १५०२३ गाव पाणीपुरवठा योजना सिद्धेश्वरकडे ३३ लाख ६९ हजार, २० गाव पाणीपुरवठा योजना पुरंजळकडे ६९ लाख २० हजार बारागाव पाणीपुरवठा योजना, वस्सा कडे १४ लाख ७९ हजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाटबंधारे विभागाची थकबाकी अडकली आहे.

औद्योगिक आणि साखर कारखान्यांकडे डोळेझाककेवळ नगरपालिकाच नव्हे, तर जिल्ह्यातील काही साखर कारखाने आणि औद्योगिक वसाहतींकडेही व्यावसायिक पाणी वापराची थकबाकी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासन तातडीने कारवाई करते, मग मोठ्या संस्थांना ही सवलत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

राजकीय नेते दबाव तंत्राचा वापरथकबाकी वसुलीत पुढाऱ्यांचा अडसर विविध महानगरपालिका व नगरपालिकेच्या थकबाकी वसुलीमध्ये राजकीय पुढारी नेहमी हस्तक्षेप करतात. कठोर कारवाई केली नाही तर थकबाकी वसूल होत नाही, परंतु एखाद्या संस्थेवर कारवाई करण्यास पथक तयार केल्यास राजकीय नेते दबावतंत्राचा वापर करीत असल्याने या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yeldari Dam Water 'Free'?: Crores Due from Parbhani, Hingoli, Nanded

Web Summary : Parbhani, Hingoli, and Nanded face recovery warnings for ₹84 crore in unpaid Yeldari dam water bills. Parbhani Municipal Corporation is the largest defaulter. Water supply may be cut if dues aren't cleared.
टॅग्स :DamधरणWaterपाणीparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र