नूकसान भरपाईच्या प्रतिक्षेत लोटले वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST2021-05-22T04:16:52+5:302021-05-22T04:16:52+5:30
सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली होती परंतू १२८२ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे ...

नूकसान भरपाईच्या प्रतिक्षेत लोटले वर्ष
सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली होती परंतू १२८२ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याने ते उगवले नाही. या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.माहीतीचा अभाव असल्याने १२८२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे खरीपाची काढणी होऊन वर्ष लोटले तरी अद्यापही मदत मात्र मिळाली नाही.विशेषतः परभणी जिल्ह्यात ईतर तालूक्यातील शेतकऱ्यांना काही तरी मदत मिळाली.मात्र सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा छदामही मिळाला नाही.याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची उदासीनतेमुळे कंपनीचे चांगभल होत आहे.
या कंपनीच्या होत्या तक्रारी
इगल(६९८),अँग्रीस्टर (२२),अंकुर (९१),ओस्वाल (२३),कृषीधन (१८),ग्रिनगेन (७१),प्रगती (२१),बुस्टर (३६),यशोदा (५०),वरदान(३४)सारस (४५),व अन्य कंपनीच्या १७३ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या होत्या.
न्यायालयात याचिका दाखल
बोगस बियाणे कंपनीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, त्याचबरोबर या कंपनी विरुद्ध सेलू न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.त्याची सुनावणी मात्र झाली नाही अशी माहिती कषी आधिकारी आनंद कांबळे यांनी दिली.