सपाटीकरणाच्या पुढे कामच सरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST2021-05-19T04:17:36+5:302021-05-19T04:17:36+5:30
जॉगिंग ट्रॅकची आखणी शिवाजी उद्यानात नाना-नानी पार्क विकसित करणे, तसेच लहान मुलांसाठी सर्व खेळणी नव्याने बसविणे आणि नागरिकांसाठी विश्रांतीचे ...

सपाटीकरणाच्या पुढे कामच सरकेना
जॉगिंग ट्रॅकची आखणी
शिवाजी उद्यानात नाना-नानी पार्क विकसित करणे, तसेच लहान मुलांसाठी सर्व खेळणी नव्याने बसविणे आणि नागरिकांसाठी विश्रांतीचे ठिकाण म्हणून लॉन तयार करणे, आसन व्यवस्था तयार करणे व महत्त्वाचे म्हणजे फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक बनविणे. यातील सध्या केवळ जमिनीचे सपाटीकरण करून एका मार्गावर अर्धवट जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी आखणी केली आहे, तर वाळू, विटा आणि अन्य बांधकाम साहित्य जागेवरच पडून आहे.
स्वच्छतागृह बंद तर काही काम अर्धवट
परिसरात तयार केलेली एक स्वच्छतागृहाची इमारत सध्या बंद आहे, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेले एक बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. यासह प्रवेशद्वाराला कुलूप नाही, तर एका ठिकाणी पत्रा लावण्यात आला आहे. या सर्व बाबीकडे लक्ष देऊन काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.