पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार दिली अन दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:06 IST2020-12-30T19:04:36+5:302020-12-30T19:06:21+5:30
कौटुंबिक कारणाने वाद झाल्याने पत्नीने सोडले घर

पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार दिली अन दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला
गंगाखेड : पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार देऊन दोनदिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात बुधवारी ( दि. ३० ) सकाळी आढळून आला. प्रकाश भुजंग ढवळे (३२, रा. महात्मा फुले नगर, गंगाखेड ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश ढवळे याचे कौटुंबिक कारणाने पत्नीसोबत वाद झाले. यामुळे २८ डिसेंबरच्या पहाटे त्याची पत्नी घरातून निघून गेली. यामुळे प्रकाश आणि त्याच्या आईने गंगाखेड पोलीस स्थानकात याची तक्रार दाखल केली. यानंतर प्रकाश गायब झाला. याबद्दल प्रकाशच्या आईने २९ डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात नृसिंह मंदिराजवळ एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे, अमजद खान पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तो प्रकाश ढवळे याचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.