'हॉर्न का वाजवला'; जाब विचारत बेशिस्त दुचाकीस्वारांचा एकावर चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:33 IST2019-09-23T19:31:53+5:302019-09-23T19:33:52+5:30

जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

'Why blow Horn'; Ask by two-wheeler attacks on one with a knife | 'हॉर्न का वाजवला'; जाब विचारत बेशिस्त दुचाकीस्वारांचा एकावर चाकूने हल्ला

'हॉर्न का वाजवला'; जाब विचारत बेशिस्त दुचाकीस्वारांचा एकावर चाकूने हल्ला

गंगाखेड (परभणी ) : 'हॉर्न का वाजवला' असे विचारत बेशिस्त मोपेडस्वारांनी चारचाकी चालकाच्या गालावर चाकू मारून जखमी केले. ही घटना रविवारी रात्री डॉक्टर लेन परिसरात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डॉक्टर लेन परिसरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका मोपेडवर तिघेजण प्रवास करत होते. मोपेडस्वार अत्यंत बेशिस्तपणे नागमोडी वळणे घेत वाहन चालवत होता. यावेळी मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाचा चालक सय्यद एजाज याने दोन तीन वेळा हॉर्न वाजवला. यानंतर एजाज यांनी चारचाकी थांबवली असता मोपेडवरील तिघांनी त्यांना हॉर्न का वाजविला असे विचारत शिवीगाळ सुरु केली. तसेच चारचाकीतील शेख जैद शेख पाशा  (२४ वर्ष रा. मोमीनपुरा, गंगाखेड) यास लाथाबुक्क्याने मारहाण करून खाली पाडले. तसेच तिघांपैकी एकाने त्यांच्यावर चाकूने गालावर वार करत जखमी केले. 

शेख जैद यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून पवन साबळे ( रा. फुले नगर, गंगाखेड ) , आकाश पंडीत, शुभम पाटील ( रा. गंगाखेड) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोउपनि सदानंद मेंडके करीत आहे.
 

Web Title: 'Why blow Horn'; Ask by two-wheeler attacks on one with a knife