दारू पिऊ नको म्हणताच चाकूने सपासप वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:14+5:302021-09-14T04:22:14+5:30
शहरातील शंकरनगर भागातील जीवाजी त्र्यंबक जाधव हे शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास गल्लीतून जात असताना झेंडा चौकाजवळ शेख नसीर ...

दारू पिऊ नको म्हणताच चाकूने सपासप वार
शहरातील शंकरनगर भागातील जीवाजी त्र्यंबक जाधव हे शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास गल्लीतून जात असताना झेंडा चौकाजवळ शेख नसीर उर्फ नासो शेख बशीर हा दारू पित उभा होता. त्याला जाधव यांनी दारू पिऊ नको, असे सांगितल्यावर शेख याने पित नाही, असे सांगितले. त्यामुळे जीवाजी जाधव हे पुढे जात असताना आरोपी शेख नसीर याने पाठीमागून त्यांच्या डोक्यात, उजव्या खांद्यावर, छातीच्या डाव्या बाजूला वार केले. त्यामुळे भेदरलेल्या जीवाजी जाधव यांनी शेख नसीर याचा चाकू धरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. या वेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. त्यानंतर जखमी जीवाजी जाधव यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्यांनी ११ सप्टेंबर रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शेख नसीर उर्फ नासो शेख बशीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.