विकेंड संचारबंदीचा रविवारी उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:26+5:302021-05-24T04:16:26+5:30
शहरात मागील पाच दिवसांपासून कडक बंदोबस्त लावत नागरिकांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात महापालिका व पोलीस प्रशासनाच्या ...

विकेंड संचारबंदीचा रविवारी उडाला फज्जा
शहरात मागील पाच दिवसांपासून कडक बंदोबस्त लावत नागरिकांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने तीन ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. यातच जिल्हा प्रशासनाने शनिवारी व रविवारी दोन दिवस संपूर्ण लाॅकडाऊन घोषित केले. मात्र, रविवारी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात फळे, भाजीपाला विक्रीची दुकाने तसेच अन्य साहित्य विक्री सुरू असल्याचे दिसून आले. याठिकाणी नागरिकांचीही खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजी चौक परिसरात पोलीस तसेच क्यूआरटी जवान ये-जा करणाऱ्यांची चौकशी करताना दिसून आले. मात्र, जिंतूर रोडवरील जाम नाका येथे सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस आणि महापालिका पथक आढळले नाही. शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत विविध आस्थापना सुरू होत्या. मुख्य बाजारपेठ वगळता गल्लीबोळामंध्ये असलेली सर्व दुकाने चोरून-लपून सुरूच होती. यामुळे विकेंड संचारबंदीचा शहरात फज्जा उडाल्याचे दिसून आले. केवळ काही ठिकाणी पोलीस कार्यरत होते. मात्र, महापालिकेचे तपासणी पथक रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आढळून आले नाही.