नाकाबंदीदरम्यान युवकाकडे आढळले शस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:35+5:302021-05-23T04:16:35+5:30
परभणी : शहरातील शिवाजी चौक भागात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका आरोपीकडे धारदार चाकू ...

नाकाबंदीदरम्यान युवकाकडे आढळले शस्त्र
परभणी : शहरातील शिवाजी चौक भागात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका आरोपीकडे धारदार चाकू आढळला. या प्रकरणी दोन्ही युवकांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जात आहे. २१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील शिवाजी चौक परिसरात नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी केली जात असताना जनता मार्केट भागातून एक दुचाकी शिवाजी चौकात दाखल झाली. पोलिसांनी दुचाकीवरील दोघांची तपासणी केली, तेव्हा एका आरोपीजवळ धारदार चाकू आढळला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपी रमीज अहमद खान आणि अब्दुल मोईज अहमद या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चाकू आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. पोलीस कर्मचारी राजेश्वर पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.