पालममध्ये काढली पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST2021-08-22T04:21:53+5:302021-08-22T04:21:53+5:30

शनिवारी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्याअगोदर ममता महाविद्यालयपासून ते गंगाखेड-पालम रोड, फळा-फरकंडा रोड, नवा मोंढा या मुख्य मार्गाने पदयात्रा ...

A walk in Palam | पालममध्ये काढली पदयात्रा

पालममध्ये काढली पदयात्रा

शनिवारी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्याअगोदर ममता महाविद्यालयपासून ते गंगाखेड-पालम रोड, फळा-फरकंडा रोड, नवा मोंढा या मुख्य मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. 'आम्ही परभणीकर', 'मिशन गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज' असे लिहिलेल्या टोप्या परिधान नागरिक सहभागी झाले होते. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडीचे नेते व कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी पदयात्रेला संबोधित केले. पालम तालुक्यातील प्रत्येकाने या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन शासनावर दबाव आणावा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव शिरस्कर, नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, लिंबाजीराव टोले, अकबर खान पठाण, शेख अहमद भाई, शेख साबीर, रामप्रसाद कदम, वंचित आघाडीचे अविनाश हनवते, आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी हनुमंतराव पौळ, युवा सेना तालुकाध्यक्ष ओमकार शिरस्कर, गजानन पवार, शिवाजी खंडागळे, श्रीकांत कराळे, अर्जुन डोंगरे, सुभाष पाटील, सौरभ दिवटे, बाळासाहेब राऊत, रामचंद्र गायकवाड, आदींनी प्रयत्न केले.

Web Title: A walk in Palam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.