सोनपेठकरांना रेल्वे मार्गाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:15+5:302021-04-24T04:17:15+5:30
पोलीस चौकी बंद परभणी : शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेली पोलीस चौकी मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणारी ...

सोनपेठकरांना रेल्वे मार्गाची प्रतीक्षा
पोलीस चौकी बंद
परभणी : शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेली पोलीस चौकी मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणारी चौकी सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
रस्त्याचे काम ठप्प
परभणी : कोल्हा पाटी ते मानवत रोड या मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामाला गती
परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते परभणी या जिंतूर राज्य मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, शहराजवळ सध्या काम सुरू आहे. नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खऱ्या अर्थाने खुला होणार आहे.
नागरिकांची गैरसोय
परभणी : शहरातील उड्डाण पुलाजवळ वारंवार रेल्वे गेट बंद होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय कायम आहे.