शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

परभणी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना मिळेना वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:12 IST

शहरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.परभणी शहरात विविध योजनेंतर्गत १६२५ घरकुल बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळूचे चार धक्के राखीव ठेवले होते; परंतु, त्यापैकी केवळ एका वाळू धक्क्यावरुन लाभार्थ्यांना वाळू दिली जात आहे; परंतु, याच वाळू धक्क्यावर इतरही वाहनधारक वाळूचा उपसा करतात. शहरी तसेच ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एकच वाळू धक्का उपलब्ध करुन दिल्याने या ठिकाणी वाळू नेण्यासाठी गर्दी होत आहे. परिणामी अनेक लाभार्थ्यांना वेळेत वाळू उपलब्ध होत नाही. दरम्यान, या प्रश्नावर नगरसेवक सुशील कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवलेले चारही धक्के सुरु करावेत व या ठिकाणाहून लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. एकच वाळू धक्का खुला असल्याने अनेक वेळा लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. त्यामुळे वाहनांच्या किरायाचा भूर्दंड लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे, असेही जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना दिलेल्या निवेदनावर बबनराव सूर्यवंशी, माधवराव निसरगण, ज्ञानोबा मस्के, जालिंदर गाडे, जिजाबाई खंदारे, चंद्रकांत वाव्हळे, विमलबाई वाव्हळे, गयाबाई गाडे, कमलबाई गाडे, रमाबाई जाधव, माणिक कांबळे, लक्ष्मीबाई मस्के, सुनील काकडे, संदीप पंडित, पंडित निकाळजे आदी लाभार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग