शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वीच सोडली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 4:24 PM

500 ब्रास वाळू उत्खनन करण्यासाठी सोईच्या वाहनांचा वापर 

पाथरी (परभणी ) :  तरुगव्हान येथील बंधाऱ्याच्या कामासाठी वाळू उत्खननास दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक साठा असल्याचा अहवाल आणि इटीएस मोजणीतही साठा अधिक आढळून आल्याने पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन झाल्याची बाब स्पष्ट होत आहे. 

विशेष म्हणजे 500 ब्रास वाळू उत्खनन करण्यास परवानगी दिल्यानंतर वाळू उत्खनन करताना महसूल यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नव्हते , कोणत्या वाहनातून वाळू वाहतूक केली जाणार आहे याची माहिती संबंधित ठेकेदार किंवा लघु पाटबंधारे विभागाचे तहसील कार्यालयाकडे लेखी कळवली नव्हती. त्यामुळे वाळू उत्खनन आणि वाहतूक याबाबत गौडबंगाल अधिक वाढले आहे. तर ठोस कारवाई होण्यापूर्वीच पकडण्यात आलेले 7 ट्रॅक्टर सोडून देण्याची घाई महसूल विभागाने केली आहे. वास्तविक पाहता बंधारा साईटवर 500 ब्रास पेक्षा अधिक किती साठा आहे. याबाबत अद्याप पूर्ण चौकशी झाली नाही. तत्पूर्वीच महसूल विभागाने पकडण्यात आलेले 7 ट्रॅक्टर पोलीस ठाण्यातून तात्पुरत्या स्वरूपात सोडून दिले आहेत. 

साडेआठ लाखांचा दंड आकारणीवाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या 7 ट्रॅक्टर चालकाकडे कोणत्याही पावत्या नसल्याने या वाहनावर आठ लाख 47 हजार 455 रुपये दंड पाथरी तहसील कार्यालयाने आकारणी करत सदर रक्कम भरण्या बाबत लघु पाटबंधारे विभागाला लेखी पत्र दिले. 

वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई500 ब्रास पेक्षा अधिक साठा आढळल्यास त्याबाबत वाढीव स्वामित्व धनाची रक्कम त्या विभागाकडून वसूल करण्याबाबत कळवण्यात आले आहे. पकडलेल्या वाहनांचे कागदपत्र मागवून घेण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहने तात्पुरत्या स्वरुपात सोडण्यात आले आहेत. - भाग्यश्री देशमुख ,तहसीलदार, पाथरी

टॅग्स :sandवाळूparabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी