तालुक्यातील ताडलिंबला येथे २४ मे रोजी आयोजित लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ.डॉ. राहुल पाटील बोलत होते. यावेळी रवींद्र पतंगे, दिनेश बोबडे, बाजार समितीचे संचालक तानाजी भोसले, विनोद लोहगावकर, सरपंच बालासाहेब पैठणे, उपसरपंच रमेशराव शेरे, बंडू देशमुख, रामा कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद मोबीन, ग्रामसेविका गीता काळे, अनिल जाधव, बालासाहेब आव्हाड, राम कोल्हे, बंडू देशमुख, विशाल शेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ.डॉ. राहुल पाटील म्हणाले की, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राप्त करून देण्यावर येत्या काळात भर दिला जाणार आहे. मोफत लसीकरणाचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे अभिनंदन केले. या लसीकरण शिबिरात दिवसभरात ३०० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. कार्यक्रमात ताडलीमला येथील कोरोना योद्ध्यांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आ.डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लसीकरण हाच कोरोनावर उपाय - राहुल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST