घरगुती गॅसचा ऑटोरिक्षासाठी इंधन म्हणून वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:31+5:302021-05-24T04:16:31+5:30
परभणी : घरगुती गॅस सिलिंडरचा गॅस ऑटोरिक्षामध्ये इंधन म्हणून वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील मराठवाडा ...

घरगुती गॅसचा ऑटोरिक्षासाठी इंधन म्हणून वापर
परभणी : घरगुती गॅस सिलिंडरचा गॅस ऑटोरिक्षामध्ये इंधन म्हणून वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येथील मराठवाडा प्लॉट भागात काही जण घरगुती गॅस सिलिंडर मधील गॅस ऑटोरिक्षामध्ये भरून इंधन म्हणून वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे २१ मे रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास पोलिसांनी मराठवाडा प्लॉट परिसरात छापा टाकला. तेव्हा दोघेजण घरगुती गॅस सिलिंडर मधील गॅसचा ऑटोरिक्षात इंधन म्हणून वापर करीत असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यांमध्ये परवेज खान शहजाद खान आणि समीर खान मकसूद खान या दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन सिलिंडर, एक मशीन आणि वजन काटा असा ऐवज जप्त केला आहे.