शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी जिल्हा परिषदेतील प्रकार : दोन वर्षांत विविध योजनांचे सहा कोटी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:04 AM

जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतील तब्बल ६ कोटी ११ लाख १८ हजार ९५ रुपयांचा निधी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षांत अखर्चित राहिला असल्याची माहिती वित्त विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतील तब्बल ६ कोटी ११ लाख १८ हजार ९५ रुपयांचा निधी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षांत अखर्चित राहिला असल्याची माहिती वित्त विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़जिल्हा परिषदेला विविध योजनांवर खर्च करण्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात २० कोटी १२ लाख ३७ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ त्यापैकी १६ कोटी ७७ लाख २ हजार ९९१ रुपयांचा खर्च या आर्थिक वर्षांत करण्यात आला़ उर्वरित ३ कोटी ३५ लाख ३४ हजार ५१९ रुपयांचा निधी खर्च करण्यात जिल्हा परिषदेला अपयश आले़ यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १ कोटी ६८ लाख ४२ हजार ६८३ रुपयांचा निधी एकट्या बांधकाम विभागाचा आहे़ त्या खालोखाल ४९ लाख ३२ हजार ३४१ रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाचा आहे़ त्यानंतर संकीर्ण अंतर्गत ४८ लाख ३४ हजार १२२ रुपयांचा निधिी अखर्चित राहिला आहे़ लघु सिंचन विभागाला मिळालेल्या निधी पैकी १८ लाख ५५ हजार ६४२ रुपये अखर्चित राहिले़ तर शिक्षण विभागाला मिळालेल्या निधीपैकी २७ लाख ६२ हजार ६९० रुपये या आर्थिक वर्षांत अखर्चित राहिले़ सामान्य प्रशासन विभागाला मिळालेल्या निधी पैकी ९ लाख ४४ हजार ४४४ रुपये तर आरोग्य विभागाला मिळालेल्या निधीपैकी ५ लाख ३३ हजार ३०१ रुपये अखर्चित राहिले़ पशूसंवर्धन विभागाचेही २ लाख ८९ हजार ७७३ रुपये अखर्चित राहिले आहेत़ महिला व बालकल्याण विभागाचे ३ लाख १० हजार ३३२ रुपये या आर्थिक वर्षांत अखर्चित राहिले आहेत़२०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिला असताना २०१७-१८ या आर्थिक वर्षांतही जिल्हा परिषदेने यातून धडा घेतलेला दिसून येत नाही़ या आर्थिक वर्षांतही १४ कोटी ८५ लाख २१ हजार रुपयांच्या आर्थिक तरतुदीपैकी २ कोटी ७५ लाख ८३ हजार ५७६ रुपये अखर्चित राहिले आहेत़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ कोटी २३ लाख १५ हजार १८९ रुपये एकट्या समाजकल्याण विभागाचे आहेत़ यातील बहुतांश रक्कम वैयक्तीक योजनांसाठीची आहे़ या शिवाय बांधकाम विभागाचे ६९ लाख ६८ हजार १२३ रुपये अखर्चित राहिले आहेत़ शिक्षण विभागातील ११ लाख ६ हजार ९०५ रुपये तर लघु सिंचन विभागातील ७ लाख ३० हजार ७१ रुपये, आरोग्य विभागातील ६ लाख १६ हजार ९७३ रुपये, कृषी विभागातील ३२ लाख ४ हजार ०६ रुपये, पशूसंवर्धन विभागातील १० लाख १ हजार ११६ रुपये व संकीर्णमधील १५ लाख ५८ हजार ३९७ रुपये अखर्चित राहिले आहेत़ दोन वर्षांत तब्बल ६ कोटी ११ लाख १८ हजार ९५ रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे़ त्यामुळे विकास कामांवर त्याचा परिणाम झाला आहे़ निधी अखर्चित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची होती; परंतु, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिला़ याबाबतची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात दिली आहे़२०१४-१५ मध्येही निधी व्यपगत४२०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षातच निधी अखर्चित राहिला नव्हे तर २०१४-१५ या आर्थिक वर्षांतही जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहिला होता़ यातील ६४ लाख ६५ हजार ३४८ रुपयांचा निधी जून २०१८ अखेर जिल्हा परिषदेच्या शेस खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे़ तिन्ही आर्थिक वर्षांत शिल्लक राहिलेल्या निधीतील बहुतांश रक्कम ही वैयक्तीक लाभांच्या योजने संदर्भातील आहे़४हा निधी संबंधित विभाग प्रमुखांकडून खर्च करून घेण्याची जबाबदारी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांची असते; परंतु, त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे़ परिणामी कोट्यवधींचा निधी उपलब्ध असूनही जिल्हा परिषदेला तो विकास कामांसाठी खर्च मात्र करता आलेला नाही़ याच्यासाठी सर्वस्वी प्रशासनच जबाबदार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीzpजिल्हा परिषद