अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:04 IST2020-02-04T20:04:08+5:302020-02-04T20:04:29+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मानवत: राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. नागनाथ उन्हाळे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
शहरातील लाड गल्ली येथे राहणारे नागनाथ उन्हाळे हे एका खाजगी संस्थेत काम करतात. मंगळवारी कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून पाथरी येथे गेले होते. काम आटपून पाच वाजेच्या सुमारास ते परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात उन्हाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे.
दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहनचालक आपले वाहन घेऊन पसार झाल्याने नेमके वाहन कोणते होते हे समजू शकले नाही. मात्र या मार्गावर दोन ठिकाणचे सी सी टीव्ही कॅमेरे तपासले असता धडक दिलेले संशयित वाहन स्कॉर्पियो असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे उन्हाळे यांचा अपघातीमृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.