दोन अनोळखी प्रेताने खळबळ
By Admin | Updated: April 29, 2015 15:49 IST2015-04-29T00:29:22+5:302015-04-29T15:49:09+5:30
बीड : तालुक्यातील चऱ्हाटा येथे एका महिलेचे व शहरातील पेठबीड भागात पुरुषाचे प्रेत आढळून आल्याने मंगळवारी खळबळ उडाली. दोन्ही प्रेताची ओळख अद्याप पटली नाही.

दोन अनोळखी प्रेताने खळबळ
बीड : तालुक्यातील चऱ्हाटा येथे एका महिलेचे व शहरातील पेठबीड भागात पुरुषाचे प्रेत आढळून आल्याने मंगळवारी खळबळ उडाली. दोन्ही प्रेताची ओळख अद्याप पटली नाही.
चऱ्हाटा येथे विश्वनाथ दगडू हुले यांच्या गट क्र. १९९ मधील विहिरीत एका अनोळखी महिलेचे प्रेत मंगळवारी आढळून आले. वय ३० इतके असून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. बाळासाहेब दत्तात्रय मांडवे (रा. मशेवाडी ता. बीड) यांनी ग्रामीण ठाण्यात खबर दिली आहे.
पेठबीड हद्दीतील रफिक पोल्ट्री फार्मच्या बाजूला सायंकाळी ५ वाजता ४० वर्षीय इसम मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांनी पोलीसांना कळविल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)