Two two-wheeled lamps; Filed a crime | दोन दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

दोन दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

दुसरी घटना पालम शहरातील मुल्ला गल्ली भागात १६ जानेवारी रोजी रात्री घडली. येथील व्यापारी सय्यद मुक्तदीन सय्यद ईफ्तेखार यांनी त्यांची (एम.एच.२२-एएच ९७१०) या क्रमांकाची दुचाकी रात्री १० वाजेच्या सुमारास उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. याबाबत आजूबाजूला विचारपूस केली असता माहिती मिळाली नाही. याबाबत त्यांनी पालम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उभ्या जीपमधील बॅटरी चोरली

शहरातील जिंतूर रोडवरील नेहरू रोड भागात संपत श्रीपतराव मस्के याने त्यांची (एम.एच.२८-सी ४५८५) या क्रमांकाची टाटासुमो जीप १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घरासमोर उभी केली होती. २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या जीपमधील बॅटरी गायब असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two two-wheeled lamps; Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.