कुलर लावताना शॉक लागून दोन सख्या जावांचा मृत्यू; पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:34 IST2025-03-26T16:34:00+5:302025-03-26T16:34:31+5:30
ऐन सणासुदीत ही दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कुलर लावताना शॉक लागून दोन सख्या जावांचा मृत्यू; पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना
- विनायक देसाई
पूर्णा : कुलरचा शॉक लागून दोन सख्या जावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील गौर येथे घडली. शेख जहुराबी शेख इसूब, बिस्मिल्लाबी इस्माईल शेख ( रा. गौर, ता. पूर्णा) अशी मयतांची नावे आहेत.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेख जहुराबी शेख ईसूब या कुलर लावण्यासाठी गेल्या असता त्यांना कुलरचा जोरदार शॉक लागला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या बिस्मिल्लाबी शेख ह्या जहुराबी शेख यांना काय झाले हे पाहण्यासाठी गेल्या असता त्यांनी शेख जहुराबी स्पर्श केला. यात त्यांचाही शॉक लागून मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत चुडावा पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच सपोनि. नरसिंग पोमनाळकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थाळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान रुगणालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. ऐन सणासुदीत ही दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.