परभणीतून दोन मुुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:03 IST2019-04-06T23:03:05+5:302019-04-06T23:03:35+5:30
ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार परभणीत घडला असून या प्रकरणी शनिवारी नवामोंढा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.

परभणीतून दोन मुुली बेपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार परभणीत घडला असून या प्रकरणी शनिवारी नवामोंढा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील पवनसूत नगर येथील संध्या नारायण राठोड (१९) आणि तिची लहान बहीण संजना नारायण राठोड (१६) या दोघी ५ एप्रिल रोजी ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघीही बाहेर पडल्या; परंतु, रात्री उशिरापर्यंत त्या घरी पोहचल्या नाहीत. त्यानंतर शनिवारी नारायण राठोड यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक आर.एस.तट, उपनिरीक्षक आर.एच. मुलपिल्लू या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, संध्या राठोड हिने लाल रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. तर संजना राठोड हिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या दोन्ही मुलींविषयी माहिती असल्यास नवा मोंढा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मल्लपिल्लू यांनी केले आहे.