परभणीत अपघातानंतर दुचाकी पेटली; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:47 IST2019-02-25T00:46:47+5:302019-02-25T00:47:16+5:30
कार आणि दुचाकीच्या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पालम-गंगाखेड रोडवर घडली.

परभणीत अपघातानंतर दुचाकी पेटली; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): कार आणि दुचाकीच्या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पालम-गंगाखेड रोडवर घडली.
एम.एच.२२ एके ८१७५ या क्रमांकाची दुचाकी गंगाखेडहून पालमकडे जात होती. त्याचवेळी एम.एच.२२ यू ७४५४ या क्रमांकाची कार गंगाखेड शहराकडे जात असताना गंगाखेड ते पालम या रस्त्यावर लाकडी मशीनजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. तर कारचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील संभाजी गणपती कोरडे (४५, रा.रोकडेवाडी) आणि अंगद बालासाहेब मुलगीर (रा.बाभळी) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांनाही पालम येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना संभाजी कोरडे यांचे निधन झाले. तर अंगद मुलगीर यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.