जिंतूरजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:39 IST2019-04-20T18:38:02+5:302019-04-20T18:39:03+5:30
लग्नाची खरेदीकरून कोल्पा गावाकडे परतत होते

जिंतूरजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
जिंतूर (परभणी ) : लग्नाची खरेदीकरून कोल्पा गावाकडे दुचाकीवर परतणाऱ्या दोघांना भरधाव टँकरने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण ठार झाल्याची घटना शुकवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान येलदरी रस्त्यावर घडली. गोपाल शेषराव सातपुते (१६ ) व वैभव नारायण सातपुते (१७) असे मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, तालुक्यातील कोल्पा येथील सातपुते कुटुंबात लग्न आहे. यामुळे जिंतूर येथे शुक्रवारी कपड्याची खरेदी करण्यात आली. त्याच रात्री खरेदी केलेली कपडे घेऊन गोपाल आणि वैभव दुचाकीवरून ( एम एच 22 एच ई-35 60) गावाकडे निघाले. याच दरम्यान, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास येलदरी रस्त्यावर शेवडी येथून एक टँकर ( एम एच 16 बी 5077 ) जिंतूर कडे येत होता. या टँकरची आणि दुचाकीची पेट्रोल पंपासमोर समोरासमोर धडक झाली. यात गोपाल शेषराव सातपुते हा युवक जागीच ठार झाला. तर वैभव नारायण सातपुते याचा उपचारासाठी परभणी कडे नेत असताना मृत्यू झाला.