अडीच हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:36+5:302021-04-06T04:16:36+5:30
आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून विद्यार्थ्यांना परभणी येथे येऊन ही परीक्षा द्यावी लागणार ...

अडीच हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून विद्यार्थ्यांना परभणी येथे येऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे. ६ एप्रिल रोजी शहरातील ९ केंद्रांवर परीक्षेची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेतली जाणार असल्याने परीक्षेचे नियोजन करण्यासाठी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात केंद्रप्रमुख, केंद्र संचालकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुरक्षित अंतर ठेवून केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी तोंडाला मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच परीक्षेला येताना पाण्याची बाटली सोबत आणण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षार्थ्यांनी केंद्रावर जाण्यासाठी परीक्षा ओळखपत्र, आधार कार्ड, सोबत येणाऱ्या पालकांचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी परभणीत विद्यार्थ्यांना येता यावे यासाठी परीक्षा कालावधी वाहतूक व ये जा करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
शहरातील परीक्षा केंद्र व परीक्षार्थींची संख्या
शारदा विद्यालय परभणी १८५
सारंग स्वामी विद्यालय २४४
बाल विद्यामंदिर, नानलपेठ ५१९, सावित्रीबाई फुले मुलींचे विद्यालय १९६
गांधी विद्यालय, कृषी सारथीनगर ३३२,
मराठवाडा हायस्कूल ५२८
जिल्हा परिषद कन्या प्रशाला ३०२
आनंद माध्यमिक विद्यालय, पिंगळीरोड २००
महात्मा फुले विद्यालय १११