निकृष्ट मका लाभार्थ्यांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:34+5:302021-05-08T04:17:34+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन वारंवार संचारबंदी जाहीर करत आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांच्या हाताला या काळात काम मिळत नाही. ...

निकृष्ट मका लाभार्थ्यांच्या माथी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन वारंवार संचारबंदी जाहीर करत आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांच्या हाताला या काळात काम मिळत नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने रेशन दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या गहू, तांदूळ, डाळ, मका, ज्वारी या धान्यावरच आपली उपजीविका भागविण्याचे काम लाभार्थ्यांकडून केले जात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, डाळ याबरोबरच आता मक्याचे वितरण केले जात आहे. मात्र, ही मका निकृष्ट दर्जाची असल्याने लाभार्थ्यांच्या उपयोगात येत नाही. त्यामुळे या मकाचे करायचे काय, असा प्रश्न लाभार्थ्यांना मधून उपस्थित केला जात आहे. लाभार्थी या निकृष्ट मक्याबाबत दुकानदारांकडे तक्रारी करत आहेत. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून जे धान्य आम्हाला प्राप्त होत आहे. त्याचे आम्ही केवळ वितरण करत आहोत, असे उत्तर मिळत असल्याने रेशन लाभार्थ्यांना मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यासाठी मका तालुक्याला प्राप्त झाली होती. मात्र, आता येणाऱ्या महिन्यासाठी आपण गव्हाची मागणी शासनाकडे नोंदवली असल्याचे नायब तहसीलदार कैलास वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.