पाथरीत रस्ता ओलांडणाऱ्या बैलगाडीला जीपची धडक;दोन ऊसतोड कामगार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 08:58 IST2019-03-05T08:44:51+5:302019-03-05T08:58:53+5:30
पहाटे 5.30 ला झाला अपघात

पाथरीत रस्ता ओलांडणाऱ्या बैलगाडीला जीपची धडक;दोन ऊसतोड कामगार गंभीर जखमी
पाथरी ( परभणी ) : राष्ट्रीय महामार्ग 61 वर 5 आज पहाटे 5.30 च्या सुमारास ऊसतोड कामगारांची बैलगाडी आणि भरधाव जीपची जोरदार धडक झाली. यात बैलगाडीतील तीन कामगार जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पाथरी येथील एका साखर कारखान्याला ऊस तोडणी साठी असलेली बैलगाडी पहाटे पाथरी येथून रेणापूर कडे निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग 61 वर पोखरणी फाट्यावर बैलगाडी रस्ता ओलांडत असतांना परभणी कडून येणाऱ्या जीपने नचौफुली रस्त्यावर बैलगाडीला जोराची धडक दिली. यात बैलगाडीत असणारे तिन्ही मजूर जखमी झाले.
जखमींमध्ये श्रीहरी महादेव तोंडे वय 40, दीपक श्रीहरी तोंडे वय 35 आणि सोनाली दीपक तोंडे वय 20 (रा केदारवस्ती ता पाथरी) यांचा समावेश आहे. नागरिकांनी जखमींना तातडीने पाथरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.