पिंप्री येथे चोरट्यांनी फोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:43+5:302021-03-05T04:17:43+5:30

तालुक्यातील पिंप्री झोला येथील गिरजाबाई गणपत म्हात्रे (६२) यांचे पती २ मार्च रोजी रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याने ...

Thieves break into house in Pimpri | पिंप्री येथे चोरट्यांनी फोडले घर

पिंप्री येथे चोरट्यांनी फोडले घर

Next

तालुक्यातील पिंप्री झोला येथील गिरजाबाई गणपत म्हात्रे (६२) यांचे पती २ मार्च रोजी रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याने घराला कुलूप लावून त्या अंगणात झोपल्या होत्या. तेव्हा रात्री ११ ते १२ च्या सुमारास आलेल्या तीन चोरट्यांपैकी एक वृद्ध महिलेजवळ थांबला, इतर दोघांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात रोख रक्कम व दागिने ठेवलेली बॅग चोरून नेली. यावेळी झालेल्या आवाजाने गिरजाबाई म्हात्रे या जाग्या झाल्या; मात्र एक चोरटा जवळच उभा असल्याने मारहाणीच्या भीतीने त्या जागेवरून उठल्या नाहीत; मात्र दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे त्यांनी पाहिले. बॅगेत ठेवलेले रोख २५ हजार रुपये व १९ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद गिरजाबाई गणपत म्हात्रे यांनी दिल्यावरून ३ मार्च रोजी रात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सउपनि बाबूराव घरजाळे करीत आहेत.

Web Title: Thieves break into house in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.