एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले
By विजय पाटील | Updated: March 1, 2025 00:25 IST2025-03-01T00:23:58+5:302025-03-01T00:25:34+5:30
Parabhani News: गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव स्टेशन (तालुका सोनपेठ) येथे शुक्रवारी (दि.२८) पहाटे चोरट्यानी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा आयुष्य प्रयत्न केला.

एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न; तीन घरांचे कुलूप तोडले
गंगाखेड - गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव स्टेशन (तालुका सोनपेठ) येथे शुक्रवारी (दि.२८) पहाटे चोरट्यानी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा आयुष्य प्रयत्न केला. तसेच तीन घरांचे कुलूप तोडण्याची घटना घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अज्ञात चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत गावात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेत असलेले पैशाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बँकेजवळील तीन घरे फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शुक्रवारी पहाटे ७ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस पाटलाने माहिती दिली. श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र कुठलाच सुगावा लागलेला नाहीये.
शाखा व्यवस्थापकाची तक्रार
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक वडगाव स्टेशन शाखेच्या चैनल गेट व दरवाजाचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. या तिजोरीत जवळपास ३५ लाख रुपये पेक्षा अधिक रक्कम होती. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक परमेश्वर नागवे यांच्या तक्रारी यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.