९० हजारांसह लॅपटॉप घेऊन चोर पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:00+5:302021-09-14T04:22:00+5:30
शहरातील वास्तुविशारद विशाल यशवंत देशमुख हे शनिवारी रात्री ११ वाजता त्यांच्या घरात झोपले होते. झोपताना त्यांच्या घराच्या मुख्य चॅनेलगेटला ...

९० हजारांसह लॅपटॉप घेऊन चोर पळाला
शहरातील वास्तुविशारद विशाल यशवंत देशमुख हे शनिवारी रात्री ११ वाजता त्यांच्या घरात झोपले होते. झोपताना त्यांच्या घराच्या मुख्य चॅनेलगेटला व त्यांच्या रूमला कुलूप लावले नव्हते. मध्यरात्री ३ च्या सुमारास त्यांच्या घरात कोणीतरी आल्याची चाहूल त्यांना लागली. या वेळी ते उठले असता एक जण त्यांचा लॅपटॉप उचलून घेताना दिसून आला. या वेळी देशमुख हे जागे झाले असता चोरटा त्यांना पाहून लॅपटॉप घेऊन पळून गेला. त्यामुळे देशमुख हे चोरट्याच्या पाठीमागे गेले असता चोरटा पसार झाला. या वेळी घरात येऊन त्यांनी पाहिले असता त्यांचे कपाट उघडे होते. तसेच आतील ९० हजार रुपये गायब होते. याबाबत विशाल देशमुख यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात १२ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.