दुचाकीवर आले अन् शेळी घेऊन गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:17+5:302021-04-24T04:17:17+5:30
डफवाडी येथील शेख मंजूर शेख अलाउद्दीन यांच्याकडे ८ शेळ्या आहेत. २० एप्रिल रोजी सायंकाळी त्यांनी त्यांच्या घराच्या टीन पत्र्याच्या ...

दुचाकीवर आले अन् शेळी घेऊन गेले
डफवाडी येथील शेख मंजूर शेख अलाउद्दीन यांच्याकडे ८ शेळ्या आहेत. २० एप्रिल रोजी सायंकाळी त्यांनी त्यांच्या घराच्या टीन पत्र्याच्या शेडमध्ये सर्व शेळ्या बांधल्या होत्या. मध्यरात्री ३ च्या सुमारास दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी पत्र्याच्या शेडमधील एक शेळी दुचाकीवर घेतली. यावेळी शेळीच्या ओरडण्याचा आवाज आला. यावेळी शेळीच्या बाजूला झोपलेला शेख मंजूर यांचा मुलगा शेख मुस्ताफा याला जाग आली. यावेळी त्याने आरडाओरडा करताच दुचाकीवरील मांडाखळीकडून आलेले दोघेही शेळीला घेऊन उमरी रोडने निघून गेले. त्यानंतर घरातील मंडळी जागे झाली. त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला ; परंतु ते आढळून आले नाही. याबाबत शेख मंजूर शेख अलाउद्दीन यांनी दैठणा पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी फिर्याद दिली. त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.