Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:36 IST2025-03-25T11:36:04+5:302025-03-25T11:36:34+5:30

केबिनच्या काचा फोडून तीन प्रवासी तर रस्त्यावर कोसळले; परभणी गंगाखेड मार्गावरील दैठणा गावाजवळील घटना

The driver parked the truck on the middle of road; a private bus hit it shortly after, passengers were thrown out of the cabin | Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली

Parabhani: मुजोर चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला; काही वेळातच ट्रॅव्हल्स धडकली

- लक्ष्मण कच्छवे
दैठणा :
गंगाखेड परभणी महामार्गावर मंगळवारी पहाटे  उभ्या ट्रकला खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सने धडक दिली. या अपघातात ३० प्रवासी बालंबाल बचावले असून पाच जण जखमी झाले.

पुण्याहून ३० प्रवासी घेऊन खाजगी बस ट्रॅव्हल्स क्रमांक (एम एच २९ वाय ८८००) परभणी गंगाखेड मार्गे नांदेडला जात होती. यादरम्यान दैठणा येथील महाराणा प्रताप चौकात सोमवारी रात्रीपासून ट्रक क्रमांक ( एम एच २६ बीइ ८२२९) नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या मधोमध उभा होता.  पहाटे पाच वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली. यात पार्वती इंगळे, लक्ष्मी ढाकणे, मुंजाजी ढाकणे, पद्मावती सोनवणे व अन्य एक प्रवासी जखमी झाला. जखमींना तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तीन प्रवासी चालक केबिनमधून रस्त्यावर पडले 
ट्रॅव्हलची धडक इतकी जोरात होती की यातील तीन प्रवासी हे ट्रकला धडक होताच चालकाच्या केबिन मधून काच फुटून रस्त्यावर पडले. यात ते जखमी झाले.

ट्रक मालकाची आरेरावी
ट्रक नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या मधोमध उभा होता. काही ग्रामस्थांनी हे अपघात प्रवण  स्थळ आहे. ट्रक रस्त्याच्या बाजूला घ्या असे सांगितले. मात्र हा ट्रक माझा आहे तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून ट्रक जागेवरच उभा ठेवला. त्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: The driver parked the truck on the middle of road; a private bus hit it shortly after, passengers were thrown out of the cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.