दाम्पत्याने एकाच खोलीत घेतला गळफास; पतीचा मृत्यू, तर दोरी तुटल्याने गर्भवती पत्नी बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:11 IST2022-04-14T16:11:02+5:302022-04-14T16:11:22+5:30
सात वर्षांच्या सुखीसंसारानंतर दाम्पत्याने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दाम्पत्याने एकाच खोलीत घेतला गळफास; पतीचा मृत्यू, तर दोरी तुटल्याने गर्भवती पत्नी बचावली
गंगाखेड ( परभणी ): सात वर्षांच्या सुखी संसाराला नजर लागली आणि दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत एकाच खोलीत गळफास घेतल्याची घटना मसनेरवाडी येथे आज पहाटे ५ वाजता उघडकीस आली. या धक्कादायक घटनेत पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्याने सुदैवाने पत्नी बचावली. धक्कादायक म्हणजे, पत्नी ८ महिन्यांच्या गर्भवती आहे. माधव भाऊसाहेब मिसे (३० ) असे मृताचे नाव आहे.
मसनेरवाडी येथील रहिवासी माधव भाऊसाहेब मिसे आणि अरुणा यांचा विवाहास सात वर्ष झाली आहेत. त्यांना दोन मुली आहेत. आज सकाळी मिसे पती-पत्नीने त्यांच्या खोलीतून बाहेर आली नाहीत. यामुळे माधव यांचा भाऊ आणि ग्रामस्थांनी खोलीच्या खिडकीतून आत डोकावले असता दोघांनी गळफास घेतल्याचे चित्र दिसून आले. दरवाजा तोडून आत गेल्यास माधव गळफास बसल्याने मृत झाला होता. तर गळफास तुटल्याने अरुणा बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तत्काळ अरूणाला उपचारासाठी उप जिल्हारूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने अरुणाला अधिक उपचारासाठी परभणीला हलविण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, अरुणा ८ महिन्यांची गर्भवती आहे. सात वर्षांच्या सुखीसंसारानंतर दाम्पत्याने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.