लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 12:45 IST2017-12-14T12:43:46+5:302017-12-14T12:45:53+5:30

ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशिरा अटक केली.

Teacher rape in Sevik, showing marriage lure in Purna | लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार 

लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार 

पूर्णा (परभणी ) : ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशिरा अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक देवानंद गोरे यांचे त्याच शाळेतील २६ वर्षीय सेविकेसोबत प्रेम संबंध होते. दरम्यान गोरे याने सेविकेला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातच  काही दिवसांपूर्वी गोरे दुस-या मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याची,माहिती सेविकेला मिळाली. यावे तिने आक्षेप घेतला असता गोरे याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी बुधवारी (दि.13) पीडित सेविकेने ताडकळस पोलीस ठाण्यात रात्री १० च्या दरम्यान तक्रार दिली. या तक्रारीवरून शिक्षक गोरे याच्याविरोधात बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी फौजदार सुनील वाघमारे, जमादार दीपक जाधव यांच्यासह पूर्णा येथून जात रात्री उशिरा गोरेला ताब्यात घेतले. पुढील तपास फौजदार सुनील वाघमारे हे करीत आहेत.

Web Title: Teacher rape in Sevik, showing marriage lure in Purna