खासगी दवाखान्यासमोर दरपत्रकाचा बोर्ड लावणार -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:22+5:302021-04-24T04:17:22+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोनाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींची आढावा बैठक झाली. याबैठकीत आ. डॉ. राहुल पाटील, आ. मेघना बोर्डीकर आदींनी खासगी ...

खासगी दवाखान्यासमोर दरपत्रकाचा बोर्ड लावणार -जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोनाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींची आढावा बैठक झाली. याबैठकीत आ. डॉ. राहुल पाटील, आ. मेघना बोर्डीकर आदींनी खासगी रुग्णालयातील दराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले की, खासगी दवाखान्याच्या अनुषंगाने आलेल्या काही तक्रारीबाबत सध्याची परिस्थिती पाहता टोकाची भूमिका प्रशासन घेणार नाही; परंतु येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडून विविध उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या दराबाबत या दवाखान्यांसमोर बोर्ड लावण्याचे आदेश संबंधितांना देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागात क्वारंटाइनसाठी शाळांचा वापर करण्यास सुरुवात केली जाईल. येथे प्रशासनाकडून संबंधितांच्या जेवणाची सोय करण्यात येईल. ग्रामीण भागातील रुग्ण परभणी शहरात येत असल्याने शहरातील रुग्णालयांवर ताण येत आहे. यासाठी ग्रामपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून तेथेच उपचाराची सुविधा निर्माण केली जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.