शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय समिती करणार सरकी, कापूस गाठीचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 17:05 IST

शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

परभणी : अवकाळी पावसामुळे शासकीय हमीभाव खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या सरकी आणि कापूस गाठीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. खरेदी केलेला कापूस जिनिंग प्रेसिंग परिसरामध्ये साठवून ठेवला असून, मागील दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिनिंगवरील कापूस गाठी आणि सरकी भिजून नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या कापूस गाठी आणि शिल्लक सरकीची नोंद घेण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत.

या समितीमध्ये तहसीलदार, सहायक निबंधक, बाजार समितीचे सचिव, जिनिंग-प्रेसिंग व्यापारी प्रतिनिधी आणि ग्रेडर यांचा समावेश राहणार आहे. विक्री व उचल झालेल्या सरकीचे पंचनामे केले जाणार असून, शिल्लक असलेली सरकी जागेवरच विक्री करून त्या ठिकाणी नवीन कापूस खरेदी करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.  मान्सून शेड उभारण्याचे आदेशराज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावयाचा असून, सध्या पावसाचे दिवस लक्षात घेता जिनिंग प्रेसिंग परिसरामध्ये कापूस आणि सरकी साठविण्यासाठी मान्सून शेड उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. आठही तालुक्यांमधील जिनिंग-प्रेसिंगमध्ये दोन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर हे मान्सून शेड उभारावेत. त्यासाठी येणारा खर्च बाजार समितीच्या मार्केट सेसमधून वसूल करावा, असे या आदेशात सूचित केले आहे.

टॅग्स :cottonकापूसparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीagricultureशेती