तलाठी संकलित करणार पीक कर्जाचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:12+5:302021-05-26T04:18:12+5:30
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले जाते. पीक कर्जासाठी शेतकरी बँकांच्या कार्यालयात गर्दी करतात. त्यामुळे ...

तलाठी संकलित करणार पीक कर्जाचे अर्ज
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले जाते. पीक कर्जासाठी शेतकरी बँकांच्या कार्यालयात गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पीक कर्जासाठी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयातही हे अर्ज ठेवण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी डाऊनलोड केलेला अर्ज किंवा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेल्या पीक कर्जाचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह भरून संबंधित तलाठ्यांकडे सादर करावा, तलाठ्यांनी गावनिहाय अर्ज संकलित करून संबंधित गाव ज्या बँकेकडे दत्तक आहे, त्या बँकेत जमा करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.