शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

परभणीत राष्ट्रवादी-स्वाभिमानी संघटनेनं जाळला दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा

By admin | Published: May 11, 2017 2:37 PM

शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पुतळा जाळला.

ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 11 - शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गुरुवारी (11 मे) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहन केले.
 
जालना येथील एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीच्या अनुषंगाने बुधवारी आक्षेपार्ह विधान केले होते. दानवे यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
 
गुरुवारी दुपारी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम, किशोर ढगे, बाळासाहेब कदम, जाफर शेख आदी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले व त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
 
यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडूनही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी दानवेंविरोधात  जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, विद्यार्थी प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष सुमंत वाघ, नगरसेवक इम्रान लाला, बाबा देशमुख, किरण तळेकर आदी उपस्थिती होते.