दूध दरवाढीवर 'स्वाभिमानी' आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:13 IST2020-07-21T14:12:12+5:302020-07-21T14:13:08+5:30
शहरातील वसमत रस्त्यावरील दूध डेअरीसमोर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

दूध दरवाढीवर 'स्वाभिमानी' आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन
परभणी: दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी शहरातील वसमत रस्त्यावरील दूध डेअरीसमोर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दूध डेअरीच्या समोर सकाळी ११ वाजेच्या सुमारास रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले. तसेच दूध दरवाढीच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. त्यामध्ये दुधाला १० अनुदान देण्यात यावे, दूध पावडर निर्यातीस प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील दुग्ध विकास संस्थेचे चेअरमन सहभागी झाले होते. त्यामुळे दररोज या दूध डेअरीत ३० ते ४० हजार संकलीत होणारे दूध मंगळवारी झाले नाही.