परभणीला नागपूरहून रेमडेसिवीरचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:54+5:302021-04-06T04:16:54+5:30
लातूर पॅटर्नची तातडीने अंमलबजावणी रेमडीसिवर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी लातूर पॅटर्नची अंमलबाजवणी करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत ...

परभणीला नागपूरहून रेमडेसिवीरचा पुरवठा
लातूर पॅटर्नची तातडीने अंमलबजावणी
रेमडीसिवर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी लातूर पॅटर्नची अंमलबाजवणी करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत होती. या अनुषंगाने सोमवारच्या अंकात ' लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन अन्न व औषधी प्रशासन विभागाने तातडीने लातूर पॅटर्नची अंमलबजावणी केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील २२ औषधी दुकानांची नावे, पत्ता, मोबाईल क्रमांक आदींसह माहिती सार्वजनिक स्वरुपात प्रसिद्ध केली आहे. संबंधित विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या शिवाय ९ मुख्य वितरकांची नावेही देण्यात आली असून, त्यांचे मोबाईल क्रमांकही सोबत देण्यात आले आहेत. त्यांच्याकडूनही हे इंजेक्शन उपलब्ध हाेवू शकते, असे या प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे. यामुळे आता याइंजेक्शनच्या काळ्या बाजारात आळा बसणार आहे.