शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक, विविध मागण्यांसाठी पाथरीत केला रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:55 IST

आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी झाल्याशिवाय माघार नाही

पाथरी ( परभणी ) : येथील  रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात यावी , कारखाना परिसरातील व पाथरी उपविभागातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याची हमी द्यावी या व इतर अठरा मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा यांच्या नेतृत्वात आज दुपारी पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अडीच तास रास्ता रोकोआंदोलन  करण्यात आले आंदोलना  यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खोळंबली  .

ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने पाथरी शहरातील सेलु कॉर्नर येथे गुरुवार 30 डिसेंबर रोजी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले  .प्रारंभी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली .हा मोर्चा घोषणाबाजी करत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सेलु कॉर्नर येथेत आला होता .याठिकाणी शेतकऱ्यांनी अडीच तास ठिय्या करत वाहतूक अडवून धरली होती. 

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कॉम्रेड राजन शिरसागर ,कॉम्रेड शिवाजी कदम ,कॉम्रेड विजयसिंह कोल्हे ,ज्येष्ठ शेतकरी नेते विश्वनाथ थोरे ,कॉम्रेड नवनाथ कोल्हे आदींनी मार्गदर्शन केले .दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांना ठोस आश्वासन दिल्याशिवाय या ठिकाणावरून न उठण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली होती. या ठिकाणी सुरु असलेले आंदोलन थांबविण्यात यावे यासाठी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण मध्यस्थी करत होते. दरम्यान, सहकार आयुक्त, अपर जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्त यांच्या मार्फत मंत्रालयात श्री रेणुका शुगर साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवणे संदर्भात प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका घेतली .यावेळी नायब तहसीलदार एस .बी . कट्टे यांच्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री , साखर आयुक्त व परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ..आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती .आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती.   मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी न लागल्यास पुढील आंदोलन हे जेलभरो आंदोलन असेल.- कॉम्रेड राजन क्षीरसागर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी