शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-गंगाखेड महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:38 IST

तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने गंगाखेड तालुक्यात भिषण पाणीटंचाईबरोबरच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ या भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडून हतबल झाला आहे़ शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणाºया मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने गोदावरी नदी काठच्या गावांमध्ये कधी नव्हे अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुळी बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, रोजगार हमीची कामे सुरू करावीत आदी मागण्यांसाठी तालुक्यातील खळी पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़या आंदोलनात कॉ़ राजन क्षीरसागर, माजी खा़ सुरेश जाधव, लक्ष्मणराव गोळेगावकर, माणिक पवार, गोपीनाथ भोसले, संजय कच्छवे, माणिक कदम, सुरेश इखे, शिवाजी कदम, सूर्यमाला मोतीपवळे, गोविंदराव मानवतकर, विजय सोन्नर, चंद्रकांत जाधव, लहू सलगर, गंगाधर जाधव, राजाभाऊ कदम, साहेबराव भोसले, दादासाहेब पवार, अशोक भोसले, रामेश्वर पवार, गजानन लांडे, दत्ता पवार, बळीराम सोन्नर आदींसह नागरिक सहभागी झाले होते़ नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंगडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड यांनी आंदोलनकर्त्यांचे विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले़यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता़ यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सैदाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लासेवार, अण्णा मानेबोईनवार, कल्याण साठे, उमाकांत जाधव, सुग्रीव कांदे यांची उपस्थिती होती़दरवाजे बसविण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादरच्गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयाला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे निखळून पडले आहेत़च्या जागी नव्याने उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याचा प्रस्ताव ६ मे रोजी शासनाकडे सादर केला आहे़च्याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विलास कापसे यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिली़अडीच तास वाहतूक ठप्पच्मुळी बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्यात यावेत, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी गंगाखेड- परभणी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले़ त्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ परिणामी अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनdroughtदुष्काळWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प