शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 19:00 IST

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची गैरसोय 

- संतोष मगरपरभणी : जिल्ह्यातील चारही आगारांत एसटी महामंडळाच्या बहुतांश बस नादुरुस्त आहेत. कधी स्टेअरिंग जाम तर, कधी चाक निखळण्याच्या घटना पुढे आल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ‘एसटीचा प्रवास, सुखी प्रवास’ अशी अपेक्षा फोल ठरत आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजना असल्याने प्रतिसाद मिळतोय. मात्र नादुरूस्त बस आणि नियोजनाच्या अभावामुळे ९ ऑगस्टला गंगाखेडहून पालमला जाणाऱ्या बसचे चाक निखळून पडले होते. या घटनेत ६२ प्रवासी बचावले. यापूर्वी पूर्णा तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली. यातही प्रवासी बचावले होते. १९ मार्चला सायाळा पाटीवर स्टेअरिंग तुटल्याने बस पलटल्याची झाली होती. काही दिवसांपूर्वी राणीसावरगाव येथे चाक निखळले होते. चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला होता. बसचा कुठे दरवाजा निखळतो तर, कुठे ब्रेक फेल. यासह नादुरुस्त बस धावत असल्याने प्रवाशांना  अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो.   

फिटनेस सर्टिफिकेटवरही प्रश्नचिन्हबस नादुरुस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नादुरुस्त बसवर तसे शिक्कामोर्तब करणे टाळणे आवश्यक आहे.

सर्वाधिक घटना गंगाखेड आगारातील गंगाखेड येथील आगरातील बसच्या बिघाडात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बसचा पाटा निखळून पडणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे, स्टेअरिंग तुटणे, ब्रेकफेल होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याने बस प्रवास धोकादायक बनला आहे. यासह अनेक तांत्रिक बिघाड होणे नित्याचेच झाले असल्याची स्थिती आहे. प्रवासात रस्त्यातच बस बंद पडल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

अपघातास कारणीभूत कोणवाहन चालवताना चालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्यूटीवर चढण्यापूर्वी चालक-वाहकाची तपासणी केली जाते. तसेच बस मार्गस्थ करण्यापूर्वी दुरुस्त आहे की, नाही याबाबतही तपासणी केली जाते. मग अपघात झाल्यास यात जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च तरीही...जिल्ह्यातील चारही आगारांतील बस दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बसकडे लक्ष दिले जात असल्याचे महामंडळाकडून  सांगण्यात येते. वास्तवात मात्र, बस रस्त्यावर धावताना असे प्रकार घडतात. प्रवाशांची सुरक्षितता महामंडळाकडून नेहमीच लक्षात घेतली जाते. मात्र, अशा घटना होऊ नये याकरिता सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत. अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. - प्रवीण शिंदे, उपयंत्र अभियंता

टॅग्स :Accidentअपघातtourismपर्यटनstate transportएसटीparabhaniपरभणी