दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST2021-05-20T04:18:07+5:302021-05-20T04:18:07+5:30
परभणी मनपा व जिल्हा परिषद यांच्याकडील दिव्यांगांचा पाच टक्के निधी त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांना ...

दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन
परभणी मनपा व जिल्हा परिषद यांच्याकडील दिव्यांगांचा पाच टक्के निधी त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांना गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन वाटप करण्यात येत होते. ते अद्याप दिलेले नाही ते त्वरित देण्यात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धान्य किटसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, गेल्या एक वर्षापासून हे धान्य मिळालेले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे दिव्यांगांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत देण्यात यावे. दिव्यांगांसाठी विनाअट घरकुल योजना अमलात आणावी या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संजय वाघमारे, शैलेश नवघडे, दीपक घाडगे, रामराजू कागणे, गणेश घोडके, ज्ञानू कदम, ज्ञानदेव ढाले, संतोष जोंधळे, राहुल शिवभगतां यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. येत्या ३१ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.