SSC Result: दहावीत नापास झाल्याने नैराश्यात सतरावर्षीय मुलीने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:56 IST2025-05-17T15:55:59+5:302025-05-17T15:56:37+5:30
सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान परभणी येथे झाला मृत्यू

SSC Result: दहावीत नापास झाल्याने नैराश्यात सतरावर्षीय मुलीने संपवले जीवन
परभणी : दहावी परीक्षेत नापास झाल्यामुळे नैराश्यातून अपर्णा संजय पडोळे (१७, ह.मु. मरडसगाव, ता. गंगाखेड) या विद्यार्थिनीने धान्यातील विषारी औषधी गोळ्या खाल्ल्या. यामध्ये सदरील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान सरकारी दवाखान्यात बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
अपर्णा पडोळे ही हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जडगाव येथील रहिवासी असून, ती सध्या गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथे एका आश्रमात वास्तव्य करत होती. अपर्णा पडोळे हिने दहावी परीक्षेत नापास झाल्यामुळे नैराश्यात राहून तिने धान्यातील विषारी औषधी गोळ्या खाल्ल्या. यानंतर तिला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी परभणी येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तराज गुरू कान्हेराज पंजाबी यांनी खबर दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक अंधोरीकर करीत आहेत.