५० फळे, भाजी विक्रेत्यांची जागेवरच तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:45+5:302021-05-08T04:17:45+5:30
परभणी शहरासह जिल्हाभरात संचारबंदी असतानाही अनेक व्यक्ती व हातगाडे चालक रस्त्यावर सर्रास वावरताना दिसून येत आहेत. अशांवर यापूर्वी उपविभागीय ...

५० फळे, भाजी विक्रेत्यांची जागेवरच तपासणी
परभणी शहरासह जिल्हाभरात संचारबंदी असतानाही अनेक व्यक्ती व हातगाडे चालक रस्त्यावर सर्रास वावरताना दिसून येत आहेत. अशांवर यापूर्वी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दंडात्मक कारवाई केली होती. संचारबंदीत दुकान उघडणाऱ्या काही व्यावसायिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी डॉ. कुंडेटकर यांनी कारवाईचे स्वरूप बदलले. शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, अपना कॉर्नर, जिंतूर रोड, वसमत रोड, शिवाजी नगर आदी भागात फिरून त्यांनी रस्त्यालगत थांबून फळे व भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तींची आरोग्य विभागाच्या पथकाला सोबत घेऊन जागेवरच आरटीपीसीआर चाचणी केली. दुपारी १२ ते ४ या वेळेत राबविलेल्या या मोहिमेत दिवसभरात ५० जणांची चाचणी करण्यात आली. संबंधितांचा चाचणी अहवाल शनिवारी येणार असून, त्यांना तो तातडीने कळविला जाणार आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. कुंडेटकर म्हणाले.