भरधाव वेगातील ट्रक नालीवर जाऊन आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:18+5:302021-09-14T04:22:18+5:30
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून शनिवारी दुपारी २ च्या सुमारास एमएच २३ डब्ल्यू ३६९० क्रमांकाचा ट्रक भरघाव ...

भरधाव वेगातील ट्रक नालीवर जाऊन आदळला
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून शनिवारी दुपारी २ च्या सुमारास एमएच २३ डब्ल्यू ३६९० क्रमांकाचा ट्रक भरघाव वेगाने वसमत रस्त्याने जात होता. शहरातील राजगोपालाचारी उद्यान परिसरात शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीवर जाऊन हा ट्रक आदळला. यात नालीचे मोठे नुकसान झाले तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानी ट्रकचालकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत पोलीस कर्मचारी सुधाकर राऊत यांनी शनिवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. यावरून भरघाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी ट्रकचालक नसीर खान जाफर खान (रा. रा.मोहमदिया कॉलनी, परळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.