लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:02 IST2018-04-30T15:02:56+5:302018-04-30T15:02:56+5:30
रत्नापुरजवळ लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली.

लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी
मानवत (परभणी ) : रत्नापुरजवळ लग्नाचा टेम्पो उलटून सहा वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथरी तालुक्यातील पोहे टाकळी येथील वऱ्हाडी कार्यासाठी टेम्पोमधून शहरात येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापुरजवळ वऱ्हाडी आले असता टेम्पो अचानक उलटला. यामुळे टेम्पोमधील सहा वऱ्हाडी जखमी झाली. जखमींमध्ये राधाकिशन बागल ( वय १४), भागवत गोंगे ( वय १८), संदिप शाहुराव गोंगे ( वय १७) माउली गोंगे ( वय १८), गणेश माणिक गोंगे ( २०) व प्रशांत राजेभाउ गोंगे ( वय १९ ) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.