गंगाखेड येथे पीककर्जासाठी शिवसेनेचे बँक परिसरात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:06 IST2018-06-25T16:05:53+5:302018-06-25T16:06:10+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी येथील महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक व भारतीय स्टेट बँक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

गंगाखेड येथे पीककर्जासाठी शिवसेनेचे बँक परिसरात ठिय्या आंदोलन
गंगाखेड (परभणी ) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी येथील महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक व भारतीय स्टेट बँक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजविणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, ऑनलाइन सातबारा मिळत नसल्याने तलाठी हस्तलिखित सातबारा स्वीकारावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णु मुरकुटे, कृऊबाचे सभापती बालासाहेब निरस, सखुबाई लटपटे, महेश साळापुरीकर, राजेश बडवणे, जानकीराम पवार, नामदेव निरस, गंगाधर पवार, कुंडलिक भडके, सुरेश नळदकर, जितेश गोरे, बेंबळगे, नगरसेवक तुकाराम तांदळे, इंद्रजित हाके, सुभाष देशमुख, श्रीमती संगिता घाडगे, श्रीमती फड, माधव शेंडगे, अरविंद सलगर, धोंडीराम जाधव आदींचा सहभाग होता.